हेल्मेट वापरण्याचे प्रमाण पुन्हा घटले

समुपदेशन बंद; कारवाईचा धडाका

पुणे –शहर वाहतूक पोलीस दररोज तब्बल चार ते पाच हजार जणांवर नो-हेल्मेट कारवाई करत आहेत. मध्यंतरी कारवाई केलेल्यांना समुपदेशनाचा धडाका लावण्यात आला होता. मात्र, आता समुपदेश मागे पडले असून फक्त कारवाईचाच धडाका सुरू असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे आवाहन तसेच कारवाई करुनही नागरिकही हेल्मेटसक्‍ती गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहेत. मध्यंतरी हेल्मेट वापरण्याचे वाढलेले प्रमाण पुन्हा एकदा कमी झालेले दिसून येत आहे.

शहरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. चौका-चौकांत दुचाकीस्वारांना पकडून 500 रुपये दंड लावण्यात येत आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आदेश विचाराधीन घेऊन हेल्मेट कारवाई केलेल्या व्यक्तीकडून दंड वसुलीपूर्वी त्याचे दोन तास समुपदेशन करण्याचे सांगण्यात आले आहे. जेणेकरून संबंधित व्यक्तीला हेल्मेटचे महत्त्व समजून तो पुन्हा हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देईल, हा उद्देश यामागे आहे. यानुसार सुरवातीच्या काळात वाहतूक पोलिसांनी प्रत्येकाला समुपदेशनाचे धडेही दिले. मात्र, समुदेशनाचे धडे घेण्यास नागरिक पुढे येत नसल्याचे दिसते. यामुळे 15 ते 20 जणांचीच समुपदेशनाला उपस्थिती दिसते. पूर्वी ही उपस्थिती 25 ते 50 च्या घरात होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.