ऊसदर आंदोलन चिघळले; राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे सावळवाडीतील ऑफिस पेटवले 

सांगली – सांगली जिल्ह्यात ऊस दराच्या एफआरपीचे आंदोलन चिघळलं आहे. एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून मध्यरात्री अज्ञात शेतकऱ्यांनी सावळवाडी येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे गट ऑफिस पेटवले. कागदपत्रे, फाईल आणि फर्निचरला आग लावण्यात आली आहे.

राजारामबापू सहकारी साखर कारखाना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आहे. या कारखान्याने उसाच्या एफआरपीची एक रकमी किंमत दिली नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप आहे.

दोनच दिवसांपूर्वी गनिमी काव्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.