‘योग’ ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाभ्यासाला स्थान दिल्यास त्याचे अनेक शारीरिक व मानसिक फायदे भेटू शकतात. आजच्या घडीला जगाच्या पाठीवरील अनेक देश योगाभ्यासाचा अवलंब करून विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, सैनिक इत्यादींच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची यशस्वीरीत्या काळजी घेत आहेत. अशातच आता अमेरिकन नौदलानेही योगाभ्यासाचे महत्व मान्य केलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, योगाभ्यासाचे महत्व अधोरेखित करताना अमेरिकन नौदलाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक फोटो शेअर केला असून या फोटोत समुद्रामध्ये असलेल्या अमेरिकन नौदलाच्या नौकेवर काही लोक योगाभ्यास करताना दिसत आहेत. या फोटोसोबतच अमेरिकन नौदलाने, ‘योगाभ्यास हा समुद्रात असताना शरीर व मन ताळ्यावर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी नाविक योगाभ्यास करू शकतात.’ असा संदेश देखील लिहिला आहे.
Calm before the storm. #Namaste
Did you know that #Yoga is one of the many ways that Sailors can get their mind and body right at sea to stay Navy fit? #FridayFitness pic.twitter.com/1FiYwQlOSn
— U.S. Navy (@USNavy) January 10, 2020