पाकिस्तानात जाणे टाळा : अमेरिका

वॉशिंग्टन : पाकिस्तानातील दहशतवादामुळे तेथे जाण्याऱ्या नागारिकांनी त्यांच्या निर्णयाचा नागरिकांनी फेरविचार करावा, असे आवहन करत अमेरिकेने पाकिस्तानातील बलुचिस्तान, खायबर पख्तूनखा परगण्यात जाणाऱ्या नागरिकांना धोक्‍याचा अतीसतर्कतेचा इशारा दिला आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर प्रवास करू नका. या भागात लष्करी गट कार्यरत आहेत. भारत आणि पाकिस्तानने दोन्ही बाजूंनी मोठ्या संख्येने सैन्य तैनात केले आहे. सीमावर्ती भागात दोन्ही देशांच्या लष्कराकडून नियमितपणे गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला जातो, असे त्यात म्हटले आहे.

या भागातील दहशतवादी टोळ्यांसाठी हत्या आणि अपहरण हे नेहमीचे प्रकार आहेत. ते अपहरण करणाऱ्यांत सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक असा फरक करत नाहीत. त्यातून त्यांनी पोलिओ निर्मुलनाचे काम करणाऱ्यांना लक्ष्य बनवले, असे त्यात म्हटले आहे.

दहशतवादी गट पाकिस्तानात दहशतवादी कृत्ये करण्यात गुंतले आहेत. दहशतवाद आणि कोणत्या तरी ध्येय्याने हिंसाचार घडवणारे अतिरेकी यांच्या स्थानिक इतिहासात ते नागरीकांसह लष्करी आणि पोलिस ठाण्यांवर हल्ला चढवत असल्याचे नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.