अमेरिकेतही चिनी ऍपवरील बंदीचा विचार सुरू

माईक पॉम्पेओ यांची माहिती

वॉशिंग्टन – टिकटॉकसह सर्व चिनी सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घालण्याचा विचार अमेरिका करत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी काल एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. अमेरिकेतील खासदारांनी टिकटॉकच्या वापरकर्त्याचा डेटाच्या सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्‍त केली आहे. त्यांना चिनी कम्युनिस्ट पक्षाकडून हेरगिरी करणाऱ्या कंपन्या आणि सहकार्य आवश्‍यकता असलेल्या चीनच्या कायद्याबद्दल चिंता होती.

करोना विषाणूच्य प्रादुर्भावामुळे चीन आणि अमेरिकेमध्ये यापूर्वीच तणाव निर्माण झाला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर पॉम्पेओ यांचे हे वक्‍तव्य आले आहे. हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनाला दडपण्यासाठी चीनने तेथे राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्धही सुरू आहे.

टिकटॉक ऍप खुद्द चीनमध्ये उपलब्ध नाही. आपल्या कंपनीचा चीनशी थेट संबंध नाही, असे म्हणण्याचा प्रयत्न टिकटॉकने केला आहे. आपला संबंध चीनशी जोडण्यात येऊ नये, असे सांगून टिकटॉकने आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचाही प्रयत्न केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.