अमेरिकेच्या अर्थसंकल्पातील तूट सर्वाधिक पातळीवर

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अर्थसंकल्पातील तूट ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. जून महिन्यातील आकडेवारीनुसार ही तूट 864 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. करोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरीत परिणाम झाला असून त्यातूनच ही तूट वाढली आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात अमेरिकेच्या अर्थसंकल्पतील मसिक तूट 738 अब्जांवर गेली होती. ती मर्यादाही जून महिन्यात ओलांडली गेली आहे. अमेरिकेतील करसंकलन मोठ्या प्रमाणात घटले असून रोजगारीचे प्रमाणही प्रचंड प्रमाणात घटले आहे. चालू अर्थसंकल्पाच्या पहिल्या नऊ महिन्यांतील एकूण तूट आता 2.74 ट्रिलियन डॉलर्सवर गेली आहे.

हा सुद्धा एक विक्रमच मानला जातो. सध्याची सारी स्थिती पहाता संपूर्ण अर्थसंकल्पीय वर्षातील अमेरिकेची तूट 3.7 ट्रिलियन डॉलर्सवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमेरिकेने देशातील मंदीचे वातावरण नाहीसे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक सवलती घोषित केल्या आहेत. त्याचे परिणाम दिसायला अजून काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.