राजकीय नेत्यांची नावे झाकण्याची लगीनघाई

बारामतीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी – प्रांताधिकारी कांबळे

बारामती- विधानसभेची निवडणूक शनिवारी (दि. 21) दुपारी जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्यामुळे बारामती विद्यानसभ मतदारसंघात राजकीय पक्षांचे फलक तसेच सरकारी योजनांची जाहिरात नेत्यांच्या छबीसह करणारे फलक, जाहिराती हटवण्याची लगीनघाई सुरू आहे. राजकीय नेत्यांचे पुतळे झाकले जात आहेत. राजकीय नेत्यांची सार्वजनिक ठिकाणी असलेली नावेही झाकली जात आहेत. पुढील काही दिवसांत राजकीय पक्षांचा प्रचार होऊ शकेल अशा सर्वच बाबी हटवल्या तरी जातील किंवा झाकल्या जाणार असून प्रशासन या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याचे बारामतीचे प्रांताधिकारी तथा निवडूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.

दादासाहेब कांबळे म्हणाले की,आचारसंहिता जारी झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात फ्लेक्‍स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर गावागावांतील राजकीय फलक काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात होते. तसेच राजकीय नेत्यांच्यावतीनेही काही ठिकाणी फ्लेक्‍स काढून घेण्याचे काम सुरू आहे. शासकीय संपत्तीच्या विद्रूपीकरणावर निर्बंध येणार आहेत. सर्व शासकीय कार्यालये आणि परिसरामधील कार्यालयीन इमारतींचा यात समावेश होतो. शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, बॅनर, झेंडे, पेपर आदी 24 तासांच्या आत काढून टाकण्यात येणार आहेत.

शासकीय संपत्तीचे विद्रूपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर यामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, बॅनर, झेंडे, पेपर अशा जाहिराती काढून टाकाव्यात. सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच बसस्थानके, थांबे, पूल, रस्ते, शासकीय बस, विजेचे खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या इमारतीवरील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून 48 तासांच्या आत काढून टाकाव्यात. तसेच खासगी संपत्तीचे विद्रूपीकरण खासगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूक जाहीर झाल्यापासून 72 तासांमध्ये काढून टाकाव्यात असे आदेश असल्याने त्यामुळे आचारसंहितेची कार्यवाही सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here