यूपीएससी परीक्षा पुढे ढकलणे शक्य नाही; केंद्रीय लोकसेवा आयोगाची न्यायालयात माहिती

नवी दिल्ली – यूपीएससी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर उत्तर देताना आयोगाने सांगितले आहे.

परीक्षेची सर्व व्यवस्था यापूर्वीच केली गेली असल्याचे आयोगाने न्यायालयाना सांगितले. यानंतर न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीस खंडपीठाने मंगळवारपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश आयोगाला दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे.

यूपीएससी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) याआधी ३१ मे रोजी होणार होती. परंतु, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. परंतु, काही उमेदवारांनी करोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांना नोटीस बजावली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.