बॉलीवूडमध्ये सध्या काही जुन्या सुपरहिट चित्रपटांचा सीक्वल साकारण्यावर जोर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांचा सीक्वल बनविण्यात आलेला आहे. आता बॉबी देओलच्या “बिच्छू’ या हिट चित्रपटाच्याही सीक्वलची तयारी सुरू आहे.
दिग्दर्शक गुड्डू धनोआ हे आपल्य “बिच्छु’ चित्रपटाचा सीक्वल साकारणार आहे. गुड्डू धनोआने 2000मध्ये बॉबी देओल आणि राणी मुखर्जी यांना घेवून हा चित्रपट साकारला होता. धनोआ म्हणाले, “बिच्छू’ माझयासाठी एका चित्रपटापेक्षाही एक खूप मोठी उपलब्धी आहे.
आजही हा चित्रपट टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिल्यानंतर लोक मला मॅसेज करून शुभेच्छा देत असतात. सध्या मी या चित्रपटाचा सीक्वल “बिच्छू-2’ची योजना आखण्यात व्यस्त आहे.
या चित्रपटातील कलाकार आणि प्रोडक्शन हाउसबाबत चर्चा सुरू आहे. जर सर्व गोष्टी जुळून आल्यास “बिच्छू’च्या सीक्वल चित्रपटाची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. “बिच्छू-2’चा प्लॉट मी तयार केलेला आहे, असेही धनोआ यांनी सांगितले.
दरम्यान, “बिच्छू’मध्ये बॉबी देओल आणि राणी मुखर्जीची जोडी झळकली होती. दुसरीकडे बॉबी देओल नुकताच “आश्रम’ या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. तर राणी मखुर्जी ही अखेरच्या वेळी “मर्दानी-2’मध्ये झळकली होती.