युतीचे सरकार गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या विरोधात – सुप्रिया सुळे 

भोर- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी युतीच्या सरकारची कानउघडणी केली आहे. या सरकारचा संपूर्ण कारभार निष्क्रीय आहे. हे सरकार गरिबांच्या विरोधात असून, सरकारने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्यासाठी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार नाही. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

भोर तालुक्यातील पांडे, भोर, संगमनेर येथील संयुक्त प्रचार सभेत सुळे बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी कर्ज माफीच्या मुद्यावरून देखील सरकारची कानउघडणी केली आहे. आताच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मात्र आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास २००९सारखी सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन सुळे यांनी यावेळी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.