अमेरिकेकडून इतक्‍यात प्रवासी निर्बंध उठवण्याची शक्‍यता नाही

वॉशिंग्टन – करोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या बघता अमेरिकेकडून इतक्‍यात प्रवासी निर्बंध हटवले जाणार नाहीत, असे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी म्हटले आहे. सध्या अस्तित्वात असलेले प्रवासी निर्बंध सध्या तरी कायम ठेवले जातील, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या जेन पास्की यांनी म्हटले आहे.

अधिक संवेदनक्षम डेल्टा व्हेरिएंट अमेरिकेत आणि जगबरात अन्यत्र पसरत आहे. त्यामुळे अमेरिकेतील करोना रुग्णांची संख्या आगामी काही आठवड्यात वाढती राहण्याची शक्‍यता आहे. ज्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही, त्यांनाच या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे, असेही त्या म्हणाल्या.

ट्रम्प प्रशासनाने सर्वप्रथम चीनविरोधात प्रवासी निर्बंध घातले होते. त्यानंतर युरोपीय संघातील सदस्य देश, ब्रिटन आणि इराणमधील नागरिकांवर अमेरिकेने प्रवासी निर्बंध घातले आहेत. या यादीमध्ये या वर्षी मे महिन्याच्या प्रारंभी भारताचाही समावेश करण्यात आला होता.

ज्यानी लस घेतलेली आहे आणि ज्यांचे चाचणीचे निष्कर्श निगेटिव्ह आले आहेत अशांसाठी प्रवासी निर्बंध शिथील करण्यात यावेत असी मागणी युरोपीय संघाच्यावतीने अमेरिकेकडे करण्यात आली आहे. अमेरिकेतून युरोपीय संघाच्या सदस्य देशांमध्ये जाणाऱ्यांसाठी अशाप्रकारे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.