अमेरिकेत आता मधुमेहाच्या महामारीचाही धोका; करोनाच्या काळात वाढले मधुमेहाचे प्रमाण

वॉशिंग्टन – गेल्या दोन वर्षांचा कालावधी मध्ये करोना महामारीने जगाच्या सर्वच भागांमध्ये थैमान घातले असतानाच आता याच कालावधीमध्ये मधुमेहासारखी महामारी सुद्धा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. या काळामध्ये वयस्कर नागरिकांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढले असून आता 35 वर्षांवरील लोकांनीही लगेच मधुमेहाची चाचणी करून घ्यावी अशा प्रकारचे सल्ले दिले जात आहेत.

अमेरिकेत विशेषता हे मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे युनायटेड स्टेट्स प्रिव्हेंटिव्ह सर्विसेस टास्क फोर्सने दिलेल्या माहितीप्रमाणे आता पस्तिशी ओलांडलेल्या नागरिकांसाठी ही मधुमेहाची चाचणी नियमित करून घेण्याची गरज आहे. अमेरिकेतील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला स्थूलपणा आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन टास्क फोर्सने हा सल्ला दिला आहे.

मधुमेहाचा आजार असणाऱ्यांना महामारी च्या काळामध्ये खूप मोठा त्रास सहन करावा लागतो आणि त्यांच्या जीविताला ही धोका असतो. अमेरिकेतील एक तृतीयांश वयस्कर नागरिक मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असल्याने टास्क फोर्सला काळजी वाटत आहे.

या टास्क फोर्सचे उपाध्यक्ष मायकल बॉस्टन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाढत स्थूलपणा हे मधुमेहाचे एक खरे कारण असून अमेरिकेतील नागरिकांनी या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.