अमेरिकेने मोदींकडे सुपूर्द केल्या दीडशेपेक्षा अधिक पुरातन वस्तू

नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याकडे अमेरिकेने  दीडशेपेक्षा अधिक पुरातन वस्तू परत केल्या आहेत. यामध्ये157 दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू भारतातीलच आहेत. परंतु, त्या तस्करी करण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तू धातू, दगड, माती आणि सिरॅमिकपासून बनवलेल्या आहेत.

भारतीय कलात्मक वस्तूंमध्ये शेकडो वर्ष जुन्या मूर्तींचा देखील समावेश आहे. 12 व्या शतकातील साडेआठ सेंटिमीटर उंचीची ब्राँझची नटराजनची मूर्ती, दहाव्या शतकातील रेवंता यांचा तब्बल दीड मीटर लांबीचा बास रिलीफ पॅनल, तसेच हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची प्रतिकं असलेली अनेक दुर्मिळ शिल्प आहेत.

याशिवाय 45 कलाकुसरीच्या वस्तू या मध्ययुगीन काळातील आहेत. लक्ष्मी-नारायण, बुद्ध, विष्णू, शिव-पार्वती, 24 जैन तीर्थंकर, कनकलमूर्ती, ब्राह्मी, नंदिकेश अशा देवी-देवतांच्या ब्राँझच्या मूर्तींचाही यात समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.