मॉस्को – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी आता रशियाचे मित्र नसलेल्या देशांची यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे. या देशांनी रशियाच्या कंपन्या, नागरिक आणि सरकारबरोबर “मित्र नसल्याप्रमाणे’ वर्तवणूक केली आहे. असे पुतीन यांनी म्हटले आहे. रशियातील अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर या देशांनी रशियावर संयुक्तपणे निर्बंध लागू केले आहेत.
या यादीमध्ये अमेरिका आणि कॅनडा, युरोपीय संघातील सदस्य देश, ब्रिटन(जर्सी, अँगुइला, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जिब्राल्टरसह), युक्रेन, मॉन्टेनेग्रो, स्वित्झर्लंड, अल्बेनिया, अंडोरा, आइसलॅंड, लिकटेंस्टीन, मोनॅको, नॉर्वे, सॅन मारिनो, यांचा समावेश आहे. तसेच जपान, उत्तर मॅसेडोनिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, मायक्रोनेशिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि तैवानही या “मित्र नसलेल्या’ देशांच्या यादीमध्ये आहे.