मुंबई- कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. वरळी सी-लिंकडजवळ कोस्टल रोडच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे या खड्यांमध्ये पाणी साचले असून, खड्यात बुडून मुलाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुलाला खड्ड्यातून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
Mumbai: A 12-year-old boy drowned in a pit dug for a Coastal Road Project at Coastal Road, Worli Sea Link today; was admitted to nearby hospital by locals where he was declared brought dead. pic.twitter.com/HYtNzOujDG
— ANI (@ANI) July 13, 2019