ब्रिटनच्या 7 खासदारांनी सोडला मजूर पक्ष 

लंडन – ब्रिटनमध्ये लुसियाना बर्जर आणि चुका उमुन्ना यांच्या नेतृत्वाखाली 7 खासदारांनी सोमवारी मजूर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या खासदारांनी पक्ष अध्यक्ष जेरेमी कॉर्बिन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कॉर्बिन यांनी पक्षाला “संस्थात्मक’ पद्धतीने ज्यूविरोधी पक्षाचे स्वरुप दिले आहे. तसेच त्यांनी पक्षात स्वतःची अरेरावी, शोषण आणि कडव्या डाव्या विचारसरणीला बळ दिल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.

या खासदारांनी कॉर्बिन यांच्यावर एक वंशवादी पक्षाचे स्वरुप देण्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षा कमकुवत करण्याचा आरोप केला आहे. ब्रिटनच्या शत्रूंची भूमिका स्वीकारण्याचे कृत्य कॉर्बिन यांनी केले आहे. बेक्‍झिटमध्ये सुविधावादी भूमिका घेतल्या प्रकरणी कॉर्बिन यांच्यावर संबंधित खासदारांनी टीका केली आहे. मजूर पक्षात अन्य लोकांचे विचार, मत याबद्दल घृणा बाळगली जाणे सामान्य बाब असल्याचे या खासदारांनी संयुक्त निवेदनात नमूद केले आहे. अन्य पक्षांच्या खासदारांनी स्वतंत्र गटात सामील होण्याचे आवाहन उमुना यांनी केले आहे.राजकारण बदलण्यासाठी खासदारांच्या नव्या “स्वतंत्र’ गटाने मजूर पक्षाच्या अनेक पिढया तयार करण्याची शपथ घेतली आहे. या खासदारांमध्ये ख्रिस लेल्सी, अँजेला स्मिथ, गेव्हिन शुकर, एन. कॉफी आणि माइक गॅप यांचा देखील समावेश आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)