युएईने भारतासह 14 देशांवरील प्रवासी निर्बंध उठवले

आबुधाबी – जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केलेल्या लसींचे पूर्ण लसीकरण केलेल्या रहिवाशांच्या प्रवेशावरील निर्बंध उठवत असल्याचे संयुक्त अरब अमिरातीने शुक्रवारी सांगितले. त्यामुळे लसीकरण झालेले भारतातील रहिवासी 12 सप्टेंबरपासून यूएईमध्ये जाऊ शकणार आहेत.

तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, व्हिएतनाम, नामिबिया, झांबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा, सिएरा लिओन, लाइबेरिया, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि अफगाणिस्तानमधील रहिवाशांना युएईमध्ये प्रवेशाची परवानगी दिली आहे. तसच युएईमध्ये अन्यत्रही प्रवास केला जाऊ शकणार आहे.

दुबईमध्ये 1 ऑक्‍टबरपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील “एक्‍स्पो-2020′ हे प्रदर्शन सुरू हणार आहे. दुबईमध्ये या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची तयारी तब्बल दशकभरापासून सुरू होती. कोविडमुळे या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला एक वर्ष उशीर झाला आहे. या प्रदर्शनासाठी अनेक देशांची व्यवसायिक भागिदारी आहे. तसेच या प्रदर्शनामुळे युएईमधील व्यवसायिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणे अपेक्षित आहे. या प्रदर्शनाच्या आगोदर शिल्लक असलेले निर्बंधही शुथिल केले जातील, असे या प्रदर्शनाच्या आयोजकांनी सरकारी हवाल्याने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.