पिंपरी – गणेश विसर्जनासाठी इंद्रायणी नदीत उतरलेल्या चौघांपैकी दोघेजण बुडाले. ही घटना मोशी येथे रविवारी (दि. १९) सायंकाळी घडली. दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८, दोघेही रा. डुडुळगाव) अशी बुडालेल्या तरूणांची नावे आहेत. यापैकी प्रज्वल याचा मृतदेह मिळून आला असून दत्ता ठोंबरे याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हवालदार वस्ती, आळंदी रोड येथील इंद्रायणी नदीमध्ये माऊली वस्ती, डुडळगाव येथील ठोंंबरे कुटुंबातील व्यक्ती सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन करीता आले होते. त्यापैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय ३०), नितीन अर्जुन ठोंंबरे (वय ३९), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८), हे चौघेजण पाण्यात गणेशमुर्ती विसर्जनसाठी उतरले. ते पाण्यात मध्यभागी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दता ठोंबरे आणि प्रज्वल काळे हे दोघेजण पाण्यात बुडाले. त्या दोघांनाही पोहता येत नव्हते. ते मुर्ती विसर्जन केल्यानंतर आत खोल पाण्यात गेले होते.
एमआयडीसी भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी त्यांचा शोध घेतला असता. यावेळी प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला. तर दता ठोबरे यांचा शोध सुरू आहे.