दुर्दैवी ! उसाच्या उभ्या ट्राॅलीला दुचाकीची जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

माजलगाव – उसाच्या उभ्या ट्राॅलीला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात माजलगाव येथील गेवराई रोडवर केसापुरी कॅंम्पजवळ घडला आहे. रविराज रामहरी शेंडगे (वय 20, रा. उमरी), विवेक भागवत मायकर (वय021, रा. पिंपळगाव नाकले) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगावकडून दुचाकीवरून केसापुरी कॅम्पकडे जात असताना दुचाकीची उसाने भरलेल्या उभ्या ट्राॅलीला धडक बसली. या अपघातात रविराज आणि विवेक या दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओंकार काळे हा तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने माजलगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.