बेल्हे : गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील शाळेत विलीगिकरण करण्यात आलेल्या ५५ वर्षीय पुरुषाचा शुक्रवार (दि.३) रात्री मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने या व्यक्तीच्या संपर्कातील पत्नी व मुलगा यांना लेण्याद्री येथील कोविडं सेंटरमध्ये तपासणीसाठी शनिवार (दि.४) रोजी पाठवण्यात आले होते.
या दोघांचे कोविडं टेस्टसाठी स्वब शनिवारी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्या दोघांच्या रिपोर्ट सोमवार (दि.६) रोजी निगेटिव्ह आला आहे.अशी माहिती बेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. थोरात यांनी दिली. गेल्या दोन दिवसापासून गुळुंचवाडी व परिसरामध्ये भीतीच वातावरण तयार झालं होतं.रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे गुळुंचवाडीकरांना
दिलासा मिळाला आहे.