तलाठ्यास जीवे मारण्याचा वाळू ठेकेदाराचा प्रयत्न

फलटण –  सुरवडी, ता. फलटण येथे वाळू सम्राटांनी अनधिकृत वाळू वाहतूक रोखणाऱ्या तलाठ्याला अंगावर ट्रॅक्‍टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी दोघा वाळू सम्राटांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय रावसाहेब बोबडे (वय 53) असे संबंधित तलाठ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास खराडेवाडी व सुरवडी गावच्या हद्दीतील ओढ्यात बापू जालिंदर भंडलकर (रा. सुरवड़ी) हा बिगर नंबर प्लेटच्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीतून अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत होते. ही बाब तलाठी बोबडे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी जालिंदार यास रोखण्याचा प्रयत्न करून ट्रॅक्‍टर-ट्रॉली तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले असता भंडलकर याने वाळू खाली ओतुन ट्रॅक्‍टर-ट्रॉली घेऊन तो पळू लागला. मात्र तलाठी बोबडे यांनी ट्रॅक्‍टरला त्यांची कार आडवी लावली असता अनिल उर्फ खाजा पिंटू भंडलकर याने तलाठ्याला उडव अशी चेतावणी दिल्याने र्भडलकर याने ट्रॅक्‍टर तलाठ्याच्या गाडीवर घालण्याचा प्रयत्न केला.

ट्रॅक्‍टरची कारच्या मागील बाजूस धड़क बसून कारचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर दोघेही ट्रॅक्‍टर-ट्रॉली घेऊन पळून गेले आहेत. सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संजय बोबडे यांच्या फिर्यादिवरुन बापू भंडलकर आणि अनिल भंडलकर विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि नागटिळक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)