सालपे घाटात बंद पडलेल्या ट्रकला आग

लोणंद – सालपे, ता. फलटण गावच्या हद्दीत सालपे घाटात दीड ते दोन महिन्यापासून बंद पडलेल्या स्थितीत उभ्या असणाऱ्या ट्रकला काल अचानक आग लागल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सालपे घाटात दीड ते दोन महिन्यांपासून घाटात बंद पडलेल्या स्थितीत उभा असलेल्या ट्रक क्रमांक (एम एच 20 पी 4862)ला अचानक आग लागली.

आगीमुळे घाटातील वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता.येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना धुराच्या लोटात समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने संथ गतीने वाहतूक सुरू होती. आग आटोक्‍यात आणण्यासाठी लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बी. व्ही. साबळे, सहायक फौजदार क्षीरसागर चालक कानलोड तसेच फलटण नगरपरिषदेचे अग्निशामक दल यांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.