वॉशिंग्टनः अमेरिकेतल्या ट्रम्प सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास दोन दशकांनंतर पुन्हा एकदा अमेरिकेत मृत्युदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हत्या प्रकरणात दोषी आढळलेल्या पाच जणांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मृत्युदंडाची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेचे ऍटर्नी जनरल विल्यम बर्र म्हणाले, न्याय मंत्रालयाने या पाच हत्यारांसह सर्वात कुख्यात आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे.
प्रत्येक आरोपीच्या प्रकरणात निष्पक्ष सुनावणी झाल्यानंतर त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. न्याय मंत्रालयाने आधीची दिलेली शिक्षा कायम ठेवण्याची मागणी केली आहे आणि आम्ही पीडित अन् त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी या दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करतो आहे. बर्र यांनी न्याय मंत्रालयाला संघीय मृत्युदंड प्रोटोकॉलचा प्रस्तावातील तरतुदी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. जे संघीय सरकारद्वारे जवळपास दोन दशकांपूर्वी बनवण्यात आले होते. या प्रस्तावातील तरतुदींमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेचाही उल्लेख होता. त्यामुळे आता अमेरिकेत यापुढे सर्वात धोकादायक आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाणार आहे.