जिल्ह्यातून 21 जागांसाठी 373 उमेदवारांचे अर्ज
पुणे शहरातील 8 मतदारसंघांतून 165 जणांचे अर्ज
पुणे – जिल्ह्यातील विधानसभेच्या 21 जागांसाठी तब्बल 373 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि.7) पर्यंत आहे. विधानसभेच्या रिंगणातून सोमवारी किती उमेदवार माघार घेतात, याकडे लक्ष लागले. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी 444 उमेदवारांनी 595 अर्ज भरले होते. शनिवारी झालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये 71 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे 373 उमेदवारांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी झाली आहे. तर शिवसेना-भाजप यांची युती झाली आहे. तर मनसे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे.
मतदार संघनिहाय उमदेवार
जुन्नर -(12), आंबेगाव – (9), खेड- (13), शिरूर – (15), दौंड – (17), इंदापूर-(30), बारामती – (12), पुरंदर (16), भोर -(11), मावळ – (10), चिंचवड (14), पिंपरी- (31), भोसरी -(18), वडगाव शेरी -(17), शिवाजीनगर -(13), कोथरूड -(21), खडकवासला -(9), पर्वती -(15), हडपसर – (19), पुणे कॅन्टोन्मेंट -(58), कसबा पेठ -(13),