पुणे – मुंबई-बंगळुरू महामार्गावर एका माल ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चार वाहनांना तसेच एका दुचाकीस्वाराला धडक दिली आहे. यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान तांदळाची पोती घेऊन कर्नाटककडून मुंबईकडे माल ट्रक ( क्रमांक केए १७ डी ०३२१) निघाला होता. वडगांव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोर आला असता ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. आणि समोरील चार वाहनांना धडक दिली.
दरम्यान ट्रकखाली एक दुचाकी अडकल्याने ट्रक जागेवर थांबला आणि मोठा अनर्थ टळला. यामध्ये दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली आहे.