अपघातानंतर ट्रकने युवकाला चिरडले

लोणंद – लोणंद-नीरा रोडवर दुचाकीस्वाराने टेम्पोलो पाठीमागून धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीवरील दोघे युवक जखमी अवस्थेत रस्त्यावरच पडले. त्यानंतर काही क्षणातच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यातील एका युवकाला चिरडले. या अपघातात संबंधित युवक जागीच ठार झाला आहे.

गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीने टेंपोला धडक दिल्याने केशव बाळू मदने व अमोल मल्हारी खोमने (रा. कोरेगाव) हे दोन दुचाकीस्वार जखमी होऊन रस्त्यावर पडले. काही वेळाने त्याठिकाणी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (एमएच 09 इएम 7599) अपघातातील जखमी केशव बाळू मदने (रा. कोरेगाव ता. फलटण) याला चिरडले. त्यामुळे त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळावरील जमावाने लोणंद पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे श्री. वाघमारे यांनी फरार ट्रकचा पाठलाग करत चालक अविनाश कृष्णा सुतार (वय 32, रा सावर्डे जि. कोल्हापूर) यास शिवशंकर पेट्रोलपंपाजवळ ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.