पर्यटकाच्या पाकिटावर डल्ला

पाचगणीत पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी जेरबंद 
पाचगणी –
पाचगणी व महाबळेश्‍वरमध्ये सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. याचा फायदा घेत गुजरात येथील काढेवाडी गुजराती महिलांनी पर्यटकांच्या पाकिटावर डल्ला मारला.  गुरेघर येथील मॅप्रो गार्डन या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच गर्दी असते. याचा फायदा घेत या महिलांनी आज दुपारच्या सुमारास वसई येथील पर्यटक रत्ना परेरा या महिला पर्यटकाचे पाकीट या महिलांनी चोरले. मॅप्रो गार्डन गुरेघर येथे खरेदी करताना एका पर्यटक महिलेची पर्स चोरल्यावरून पाचगणी पोलिसांनी तीन महिलांच्या टोळीला जेरबंद केले असून या महिला सराईत गुन्हेगार आहेत का? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, वसई (मुंबई) येथून महाबळेश्‍वर-पाचगणी येथे पर्यटनासाठी परेरा कुटुंबीय काल गुरेघर येथे एका हॉटेलात उतरले होते. सकाळी पाचगणी येथे पर्यटन करून हे कुटुंबीय मॅप्रो गार्डन येथे दुपारी सव्वाबारा वाजता खरेदीसाठी गेले होते. येथील ओपन मॉलमध्ये खरेदी करताना परेरा कुटुंबातील रत्ना उज्वल परेरा यांच्याकडील रोख रक्कम व इतर साहित्य असणारी लेदर पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच कंपनीच्या ऑफिसशी संपर्क साधला. तेथील कर्मचाऱ्यांनी लगेच सीसीटीव्ही पाहून याबाबत खात्री केली आणि पोलिसांना कळवले.

पोलीस व कर्मचाऱ्यांनी लगेच शोध सुरू केला तर त्यांना तीन महिलांच्या टोळीने पर्स चोरल्याचा संशय आला. तपासाअंती पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संगीता भरत भाई सोडसा, प्रितीका विकास बाटूगे, संध्या विशाल राठोड या तीन महिलांबरोबरच कृणाल राजेश परमार (ड्रायव्हर) (सर्व रा. कुबेरनगर, अहमदनगर गुजरात) अशा चार जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. तर त्यांच्याजवळील तवेरा गाडी (क्रमांक जी जे 1 के ऐ 6059) ताब्यात घेतली आहे.
रत्ना उज्ज्वल परेरा यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. या महिलांना ताब्यात घेण्यासाठी व घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याच्या सपोनि तृप्ती सोनावणे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष कदम, उत्तम बाबर, सौ.जे. एम. काळे, सौ. एस. जे. फरांदे, एस. एस. गवळे, माने पोलीस कॉन्स्टेबल कदम, वसंत फडतरे, शिवाजी पामरे, अभिजित घनवट व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)