झाडे कापल्याने चिमुकली ढसाढसा रडली; मुख्यमंत्र्यांनी बनविले ग्रीन अँबेसिडर 

नवी दिल्ली – सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून एका लहान मुलीचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत झाडे कापण्यात आल्याने ही चिमुरडी रडत होती. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पाहिला जात असून लाईक आणि शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ जेव्हा तेथील मुख्यमंत्र्यांच्या नजरेस पडल्यावर त्यांनी चिमुकलीला थेट ग्रीन मिशनचे ब्रँड अँबेसिडर बनवले.

मणिपूरमधील केवळ नऊ वर्षाची मुलगी एलंगबाम वेलेंतिना हिचा हा व्हिडीओ आहे. पाचवीत शिकणारी एलंगबामने चार वर्षपूर्वी रस्त्याच्या कडेला दोन रोपे लावली होती. ती रोज त्यांना पाणी घालत आणि देखभाल करत होती. एलंगबामचे रोपटे आता मोठे झाड झाले होते. परंतु, रस्त्याचा विस्तार करण्यासाठी तेथील झाडे कापण्यात अली. हे पाहिल्यावर एलंगबामलाने रडायला सुरुवात केली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनीही एलंगबामची दखल घेत तिला ग्रीन अँबेसिडर बनविले आहे. आता एलंगबाम ग्रीन मणिपूर मिशनची अँबेसिडर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.