मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या ‘अफवाह’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसह अभिनेता सुमित व्यास आणि शरीब हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकर ‘एक मूर्ख दुसऱ्या मुर्खाला एक गोष्ट सांगतो. तो मूर्ख माणूस त्यावर विचार न करता तीच गोष्ट इतर 10 लोकांना सांगतो. अशाच पद्धतीने अफवा पसरवल्या जातात,” असा डायलॉग म्हणताना दिसते. या चित्रपटात अफवामुळे काय होऊ शकते हे दाखवण्यात आले आहे.
भूमी पेडणेकरने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करत लिहिले की, ‘तुम्ही त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकता, पण ती तुम्हाला कधीच सोडणार नाही. एक अफवा तुमचे आयुष्य उलथापालथ करू शकते.’ या चित्रपटात सुमित व्यास एका राजकीय नेत्याच्या भूमिकेत तर भूमी पेडणेकर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
‘अफवाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. तर अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.