‘लव आज कल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : करण जोहरच्या “कॉफी विथ करण’च्या शोमध्ये गमतीमध्ये सुरू झालेला संवाद आता सिरीयस बनला होता. आम्ही बॉलीवूडच्या नवीन जोडीबद्दल बोलत आहोत. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यातील अफेअर आता पुन्हा एकदा रंगायला लागले आहे. इम्तियाझ अलीच्या “लव आज कल’मध्ये कार्तिक आणि सारा दिसतील. काल या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 2020 मध्ये व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिलीज होणार आहे.


दरम्यान, अनेक दिवसांपासून त्यांच्या बहुचर्चित ‘लव आज कल’ चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. कधी सेटमधील फोटो व्हिडिओ तर कधी त्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगलेली असेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सारा – कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

चाहत्यांची ही उत्सुकता काही दिवसांनी संपणार आहे. कारण आता लवकरच या दोघांना रूपेरी पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे. नुकताच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये दोघे एकमेंकांच्या प्रेमात मग्न झालेले दिसत आहेत.

चित्रपटाचा हा पोस्टर चात्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. पोस्टरमध्ये कार्तिक प्रती साराचं असलेलं प्रेम स्पष्टपणे झळकत आहे. खुद्द सारा आणि कार्तिकने चित्रपटाचा पोस्टर त्यांच्या सोशल अकाउंटवर प्रदर्शित केला. सध्या हा पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा ‘लव आजकल’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार ? हे चित्रपट आल्यावर कळेलच. चित्रपटामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे, हे प्रेक्षकांना लवकरचं पाहायला मिळणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here