शहर वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा

नगर  – इन्शुरन्स नसणे, दुचाकी, चारचाकीवर मोबाईल वापरणे, ट्रीपलसीट, सीट बेल्ट न लावणे, तसेच हेल्मेट न वापरणाऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांची चौका-चौकात नजर असणार असून पोलीसांनी बड्‌गा उचलत कारवाईचा धडाका लावला आहे. दोन दिवसांत 100 हुन अधिक कारवाई करण्यात आली आहे.

शहरासह जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतांना दुचाकीस्वरांना हेल्मेटची जाणीव व नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. तसेच वाहतुकीचे उल्लंघन करण्याऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील विविध चौकात शहर वाहतुक पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. दोन दिवसांच्या कारवाईत 100 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हेल्मेट व दुचाकी व चारचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, तसेच वाहनांचा इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकीसह चारचाकी वाहनचालकांना चांगलीच चपराक बसणार आहे.

शहरातील डीएसपी चौक, पत्रकार चौक, स्टेट बॅंक चौक, चांदनी चौक, कायनेटीक चौक, सक्कर चौक तसेच प्रेमदान चौकात कारवाई करण्यासाठी विविध पथके शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने अचानक तैनात करण्यात येत आहे. त्यामुळे वाहतुकीचे उल्लंघन करण्याऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तसेच ही कारवाई पुस्तकी पावतीऐवजी ई-चलन पावतीद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसत आहे. शहर वाहतूक विभागासाठी पोलिसांना 25 ई-चलन मशीन देण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस विभागाला जिल्हाभरात एकूण 50 ई-चलन मशीन देण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here