सातारा नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादीने लढवली तरी “चालतयं’

आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे मिश्‍किल उत्तर

पाचगणी – आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वतंत्र पॅंनेल असेल तर ते “चालतयं’ असे उत्तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथील भेटीत दिले.

पदवीधर मतदारसंघाच्या जावळी तालुक्‍यातील मतदान केंद्राला भेट दिल्यावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पॅनेल टाकण्याचे आ. शशिकांत शिंदे यांनी संकेत दिल्याबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजेंनी “चालतयं’ असे मिश्‍किल उत्तर दिले. देशात लोकशाहीने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कोणीही निवडणूक लढवू शकतो, असे आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांना सांगितले.

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे पॅनेल टाकणार असल्याची हालचाल वरीष्ठ पातळीवरुन असल्याची माहिती आ. शिंदे यांनी दिली होती. महाविकास आघाडीचा निर्णय अंमलात आणण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली होती. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजप व महाविकास आघाडीकडून जावळी तालुक्‍यात मजबूत मोर्चेबांधणी करण्यात आली होती. सदाशिव सपकाळ, शिवाजी देशमुख, अँड शिवाजीराव मर्ढेकर यांनी दिवसभर मतदान करुन घेतले तर भाजपाकडून कांतीभाई देशमुख, बाळू जवळ व नगराध्यक्ष अनिल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते झटून काम करताना दिसत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.