सुनीता टुर्णकीचे आंदोलन स्थगित : प्रभात वृत्ताची दखल
रेडा – सात दिवसांपासून लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील टॉवेल इंजीनिअरिंग इंटरनॅशनल कंपनीसमोर बारामती येथील सुनिता टुर्णुकी प्रोजेक्ट लिमिटेड परिवाराने थकीत बिलाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले होते.
मात्र, आंदोलनाची धग वाढत चालल्याने यासंदर्भात प्रभातने सडेतोड, निपक्ष भूमिका मांडल्याने टॉवेल कंपनीने (दि. 22) सुनिता टुर्णकी प्रोजेक्ट परिवाराची थकीत बिल रक्कम दिली जाईल, असे लेखी पत्र दिल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
“प्रभात’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्याने चक्क ओमान येथून टॉवेल इंजिनिअरिंग इंटरनॅशनल लिमिटेडचे कायदेशीर सल्लागार व टीम लोणी देवकर येथील एमआयडीसी युनिटमध्ये दाखल झाली. सुनिता प्रोजेक्ट परिवाराचे प्रमुखांबरोबर टॉवेल इंजिनिअरिंगचे कायदेशीर सल्लागार शुभम बाबु व युनिट प्रमुख संजय सूर्यवंशी यांनी केली. दि. 22 पर्यंत टॉवेल लिमिटेडकडे असलेले सुनिताचे थकीत बिल दिले जाईल, असे लेखी पत्र तात्काळ दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले आहे.
दि. 22 पर्यंत सर्व थकीत बिल टॉवेलकडून मिळाले नाही तर पुन्हा लोणी देवकर येथे आंदोलन करू, अशी इशारा सुनिता टुर्नकी प्रोजेक्टचे दयानंद पेठकर, डॉ. तानाजी साळवे यांनी दिला.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे नेते युवराज पोळ, भटक्या विमुक्त संघटनेचे नेते तानाजीराव धोत्रे, परी फौंडेशनच्या प्रमुख निर्मला कुराडे, मुळशी तालुका शिवसेनेच्या महिला आघाडी उपाध्यक्षा कल्पना थोरवे, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.