नगर – जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील यांचे ग्रामसेवक युनियनच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, युवराज पाटील, मंगेश पुंड, शहाजी नरसाळे, शिवाजी पालवे, अनिल भाकरे, संतोष खाडे, श्रीकांत जराड आदी उपस्थित होते.
एकनाथ ढाकणे म्हणाले की, नगर जिल्हा परिषदेला विकासकामांची गौरवशाली परंपरा आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नगरला आलेले एस.एस.पाटील यांच्या नेतृत्वाखाली हि परंपरा भविष्यातही कायम राहिल असा विश्वास आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून आचारसंहितेनंतर नगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या कालबध्द पदोन्नतीची फाईल तात्काळ निकाली काढावी तसेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात यावा, अशी विनंती पाटील यांना करण्यात आली.