टोकियो ऑलिम्पिक होणारच

जपान संघटना व सरकारची ग्वाही

टोकियो  -करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत असला तरीही टोकियो ऑलिम्पिक कोणत्याही परिस्थितीत होणारच, अशी ग्वाही जपान ऑलिम्पिक संघटना व जपान सरकारने दिली आहे. 

करोनाच्या धोक्‍यामुळे गेल्या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलल्यामुळे जपानला मोठा आर्थिक फटका बसला आहे. जपानने या स्पर्धेच्या मुळ वेळापत्रकानुसार 12.6 अब्ज डॉलर खर्च केले होते. स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे पुन्हा एकदा मोठा खर्चही केला जात आहे.

त्यातच आता पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर जपान सरकार व संघटनेने स्पर्धा होणारच अशी ग्वाही दिल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. 

स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे हॉटेल, तिकीट, पर्यटन आदी गोष्टींवर परिणाम झाला आहे. जपान सरकारने या स्पर्धेला रिकव्हरी ऑलिम्पिक असे म्हटले होते. 2011 मध्ये आलेली त्सुनामी, भूकंप आणि फुकुशिमा अण्विक केंद्रात झालेला स्फोट या संकटानंतर देखील जपानने ऑलिम्पिकचे आव्हान स्वीकारले होते.

दरम्यान, यंदाच्या मोसमातील पहिल्या ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेपूर्वीच काही जण करोनाबाधित आढळले आहेत. यामुळे स्पर्धेबाब साशंकता निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.