65 व्या राष्ट्रीय शालेय बॅटमिंटन स्पर्धेला दिमाखात प्रारंभ
नगर – क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 65 व्या राष्ट्रीय बॅटमिंटन स्पर्धेचे उद्धाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
मात्र एकाही निमंत्रित मंत्र्यांने हजेरी लावली नाही.दिपप्रज्वन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फुगे सोडून उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्रिती पटेल या खेळाडूने उपस्थित सर्व खेळांडूना शपथ दिली. तर, शहरातील सावरा डान्स ऍकेडमीच्या विद्यार्थीनींनी नृत्य सादर करून महाराष्ट्राची पारंपारिक कलेचे पाहुण्या खेळाडूसमोर दिमाखात सादरीकरण केले. ह्या स्पर्धेला उत्सवाचे स्वरूप आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती.
या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताबाई शेळके, उपसभापती सविता गेनप्पा, अजय मिश्रा, नगरसेवक रविंद्र बाविस्कर, संदीप जोशी, नमिता फिरोदिया, बॅटमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी आदिंसह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा क्रीडा विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेसाठी आसाम, चंदीगड, आंध्रप्रदेश, दिव – दमन, दिल्ली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, जम्मू-कश्मिर आदी राज्यातील संघ या स्पर्धेसाठी हजर झाले असून 7 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेचा नगरकर क्रीडाप्रेमींना आस्वाद घेता येणार आहे.