मनपाला मिळालेले थ्री स्टारचे मानांकन हा सर्व जनतेचा बहुमान : महापौर

प्रभाग 9 मध्ये अत्याधुनिक पद्धतीने रस्ता कॉंक्रिटीकरण कामास प्रारंभ
नगर (प्रतिनिधी) –
शहरातील प्रत्तेक भागातील वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्यास प्राधान्य देत असल्याने नगरच्या जनतेला अपेक्षित काम महापौर या नात्याने करत आहे. शहरात विशेष स्वच्छता अभियान राबवतांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे मनपाला थ्री स्टार मानांकन मिळाले. हे मानांकन सर्व जनतेचा बहुमान आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

प्रभाग 9 मधील सर्जेपुरा भागातील देशमुख वाडी येथे उपमहापौर मालन ढोणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून रस्ता मजबुतीकरण व अत्याधुनिक पद्धतिने होणाऱ्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमहापौर मालन ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, संजय ढोणे, दीपक राजपूत, दीपक वखारिया, राजेश झालानी, हेमंत दंडवते, लक्ष्मीकांत कुलकर्णी, सुभाष राणा, लक्ष्मीकांत हेडा, प्रसाद भणगे, मनोज कुलकर्णी, पिंटू ढोणे आदी उपस्थित होते.

यावेळी रामदासी म्हणाले, मनपात भाजपची सत्ता आल्यानंतर शहरात विकास कामांचा वेग आला. त्यामुळे शहराची वाटचाल विकासाच्या दिशेने होत आहे.उपमहापौर ढोणे म्हणाल्या, प्रभातील प्रलंबित कामे मार्गी लागले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.