#AUSAvINDA : “अ’ संघांचा सामना अखेर अनिर्णित

सिडनी –भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या “अ’ संघात सुरू असलेला तीन दिवसीय सराव सामना अखेर अनिर्णित अवस्थेत संपला. अर्थात, या सामन्यातून भारतीय संघाच्या खेळाडूंना आगामी कसोटी मालिकेपूर्वी पुरेसा सराव मिळाला आहे. 

भारतीय संघाने आपला पहिला डाव 9 बाद 247 धावांवर घोषित केल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाने आपलाही पहिला डाव 9 बाद 309 धावांवर घोषित केला. त्यानंतर भारतीय संघाने दुसरा डाव 9 बाद 189 धावांवर घोषित केला. अखेरच्या दिवशी उर्वरित षटके खेळून काढताना ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 1 बाद 51 धावा केल्या.

हा सामना जरी अनिर्णित राहिला असला तरीही त्यात भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने शतकी खेळी केली तर, दुसऱ्या डावात यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने अर्धशतकी खेळी करत आगामी कसोटी मालिकेसाठी उपयुक्त सराव केला.

कसोटी मालिकेला 17 डिंसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेत चार सामने होत आहेत. अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत साहा याने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र, रहाणे सातत्याने अपयशी ठरत होता. त्यामुळे या सामन्यात तो कसा खेळ करतो यावरच त्याचे कसोटी संघातील स्थान अवलंबून होते. त्याने शतकी खेळी करत कसोटी संघातील स्थान निश्‍चित केले आहे.

तसेच वेगवान गोलंदाज महंमद सिराज व उमेश यादव यांनीही सरस कामगिरी केल्यामुळे कसोटी मालिकेसाठी अंतिम 11 खेळाडूंचा संघ निवडताना कर्णधार कोहलीला अनेक पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

धावफलक

भारत “अ’ पहिला डाव – 93 षटकांत 9 बाद 247 घोषित. (चेतेश्‍वर पुजारा 54, उमेश यादव 24, अजिंक्‍य रहाणे नाबाद 108, जेम्स पॅटिन्सन 3-58, ट्रेविस हेड 2-24, मिचेल नेसर 2-51). ऑस्ट्रेलिया “अ’ पहिला डाव – 95 षटकांत 9 बाद 306 घोषत. (टीम पेनी 44, मार्कस हॅरीस 35, मायकेल नेसर 33, निक मेडीन्सन 23, कॅमेरुन ग्रीन नाबाद 125, उमेश यादव 3-48, रविचंद्रन अश्‍विन 2-62, महंमद सिराज 3-83). भारत “अ’ दुसरा डाव – 61 षटकांत 9 बाद 189 घोषित. (शुभमन गिल 29, अजिंक्‍य रहाणे 28, हनुमा विहारी 28, वृद्धिमान साहा नाबाद 54, मार्क स्टेकेटी 5-37, कॅमेरून ग्रीन 2-12, मायकेल नेसर 2-41). ऑस्ट्रेलिया “अ’ दुसरा डाव – 15 षटकांत 1 बाद 51 धावा. (विल पोकोव्हस्की जखमी निवृत्त 23, मार्कस हॅरिस नाबाद 25, ट्रेविस हेड नाबाद 2, उमेश यादव 1-14).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.