चीनमध्ये पुन्हा उद्‌भवला करोनाचा धोका

बीजिंग – दक्षिण चीनमधील फुजियान प्रांतातील पुतियान शहराला पुन्हा करोनाचा धोका उद्‌भवल्याचे स्पष्ट झाले आहे. सुमारे 29 लाख लोक वस्तीचे हे शहर आहे. या शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा आता बंद करण्यात आल्या असून सिनेमागृहे, बार आणि अन्य सार्वजनिक वापराची ठिकाणेही बंद करण्यात आली आहेत.

रस्त्यावर फिरणाऱ्यांसाठी 48 तासांच्या आत करण्यात आलेली करोना निगेटिव्ह टेस्ट सक्‍तीची करण्यात आली आहे. चीनने सन 2020 मध्येच करोनावर विजय मिळवल्याचे घोषित केले होते. पण त्यानंतरही काही मोजक्‍या ठिकाणी पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

यावेळी तेथे डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. पुतियान शहरात करोनाचे 19 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची संख्या कमी असली तरी त्याचा फैलाव होऊ नये म्हणून तेथे कमालीचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.