लंडन – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ऑक्सफर्ड विद्यापिठाकडून विकसित करण्यात येत असलेल्या लसीमुळे प्रौढांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती त्वरित वाढवण्यास मदत होते आहे. वयाच्या 56 ते 69 वर्षांपर्यंत आणि 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांमधील रोगप्रतिकारक क्षमता त्वरित वाढवण्यास या लसीमुळे फायदा होतो आहे. असा निष्कर्श अभ्यासाच्या आधारे काढण्यात आला आहे.
“लॅन्सेट’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये यासंदर्भातील निष्कर्श मांडण्यात आले आहेत. हा अभ्यास्स 560 निरोगी प्रौढ उमेदवारांवर केलेल्या वैद्यकीय चाचण्यांच्या आधारे कढण्यात आला आहे. याचाच अर्थ म्हणजे ज्येष्ठ नागरिक या लसीच्या आधारे करोना विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण करू शकतात.
आतापर्यंत करोनाचा धोका रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांना अधिक असल्याचे मानले जात होते. त्यामुळे हे निष्कर्श निश्चितच उत्साहवर्धक असे आहेत. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करोनाच्या संसर्गाला उमेदवारांमध्ये प्रतिबंधत्मक क्षमता निर्माण होते का, हे तपासले जात आहे.
या महत्वाच्या टप्प्यातील निष्कर्श आगामी काही आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.