जळोची -ऑगस्ट महिन्यात करोनाची तिसरी लाट येईल, अशी शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त होत असताना राज्याच्या करोना टास्क फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे, ही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच शनिवारी बारामतीत पत्रकारांना दिली. तिसरी लाट वाढू नये, यासाठी कराव्या लागणाऱ्या नियोजनाच्या संदर्भात त्यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या.