13 सप्टेंबरपासून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू

 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश यात्रेच्या तिसछया टप्प्याचा प्रारंभ 13 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून होणार आहे. तर आठवडाभराच्या दौछयानंतर महाजनादेश यात्रेचा नाशिक येथे 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत समारोप होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेचा पहिला टप्प्याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथून केली होती. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व वेैंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला होता. तर दुसरा टप्प्याची सुरुवात जालना येथे झाली. यावेळी पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा व राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित होते.

दुसछया टप्प्यातील यात्रेचा समारोप सोलापूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व वेैंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला होता. या दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील 24 जिल्ह्यातील 106 विधानसभा मतदारसंघातून 2208 कि. मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला आहे.

आता तिसरा टप्पा 13 सप्टेंबर रोजी अकोले येथून सुरू होणार आहे. . तिसछया टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यातील 60 विधानसभा मतदारसंघातून 1,528 कि. मी. प्रवास करणार आहे. 19 सप्टेंबर रोजी नाशिक येथे यात्रेचा समारोप होणार आहे. या समारोपाच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत्‌, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व महाजनादेश यात्रेचे प्रमुख आमदार सुजितसिंह ठावूैर यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×