सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

नगर – नगर शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पावसाला सुरवात झाली,दिवसभर उघडीप दिलेल्या पावसाने अचानक सायंकाळीहजेरी लावल्याने नगरकरांची त्रेधा उडाली. नागरीकांनी मिळेल तिथे आसरा शोधला.

या पावसाने वीजेचा खेळखंडोबा केला. त्यामुळे जवळपास अर्धातास नगरकरांना अंधारात काढावा लागला.नगरकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते.अर्ध्या तासाने वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सगळे पुर्ववत झाले. जवळपास अर्धा तास पावसाने झोडपल्याने उपनगरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यात पाणी साठ्‌ले पाणी भरल्याने खड्ड्याचा अंदाज येत नव्हता या रस्त्यांनी प्रवास करतांना अपघातांना निमंत्रण मिळत होते. त्यातून वाट काढतांना नागरीकांना मोठी कसरत करावी लागत होती.

अशीच परीस्थिती शहरातही झाल्याने रस्त्यातून ये-जा करतांना नागरेक मनपाचा उद्धार करतांना दिसले. नगरकरांना आता दिवाळी पर्यंत जाळीदार रस्त्यातूनच वाट काढावी लागणार आहे. कारण आता विधानसभेच्या निवडणूुकीची आचारसंहिता सुरू असल्याने रस्त्यांचे पॅचिंग लांबणीवर पडत आहे.त्यामुळे नगरकरांची दिवाळी खड्‌डयांच्या साक्षीनेच साजरी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)