यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम ‘Building a Fairer, Healthier World’

जगभरामध्ये आज 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची थीम आहे ‘Building a Fairer, Healthier World’ म्हणजे एक सुसंस्कृत व निरोगी जग बनविणे.

7 एप्रिलला संयुक्‍त राष्ट्रातील देशांमध्ये जागतिक आरोग्य दिन पाळला जातो. 1950 साली पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिन साजरा केला होता. 7 एप्रिल दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची निर्मिती झाल्याने या दिवसाचं औचित्य साधत जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. यंदाचे 71 वे वर्ष आहे.

डब्ल्यूएचओसह आरोग्य संस्थांशी निगडीत अन्य संस्था आणि यंत्रणांच्या मदतीने या दिवशी मानवी आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. प्रत्येक वर्षी या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विशेष थीम ठरवली जाते आणि त्याभोवती या वर्षातून एकदा साजरा केल्या जाणाऱ्या आरोग्य दिनाचं सेलिब्रेशन असतं.

सध्या जगभरात कोविड 19 अजूनही थैमान घालत आहे. या जागतिक आरोग्य संकटामधून पुन्हा अनेक प्रश्‍न समोर ठाकले आहेत. आज 21 व्या शतकामधेही औषधोपचार समाजातील प्रत्येक घटकाच्या आवाक्‍यात नाहीत, विविध स्तरांमध्ये त्यात भेदभाव केले जातात. मानवी आरोग्याच्या दृष्टीने त्याविषयी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात. शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष असणं गरजेचे आहे त्यामुळे जागतिक आरोग्य दिनाचे विशेष महत्त्व आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.