ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचे फक्त राजकारण केले

मुंबई  – ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांना मराठा समाजाला न्याय दिला नाही. त्यांना मराठा आरक्षणाच्या विषयाचे फक्त राजकारण करायचे आहे. त्यामुळेच हा विषय कोर्टात टिकला नाही. मराठा समाजावर घनघोर अन्याय झाला. असं ट्विट करत  भाजपा नेते  अतुल भातखळकर यांनी  ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर भाजपचे आमदार  अतुल भातखळक यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

ते पुढे म्हणाले,’मराठाआरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. महावसुली आघाडी सरकारने सत्ता हातात घेतल्या दिवसापासून मराठा आरक्षणच्या विषयाचे पोतेरे केले. कोर्टात ठामपणे बाजू मांडली नाही.फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी केलेली यशस्वी व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून टाकली.धिक्कार असो या नाकर्त्यांचा.’ असं म्हणत  भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.