कापड उद्योग वेगाने पूर्वपदावर

नवी दिल्ली – तयार कपड्याच्या उद्योगाची उलाढाल वेगाने वाढत असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे.

तयार कपड्याच्या निर्यातपेठेत आपले स्थान बळकट करण्यासाठी भारतातील कापड निर्यात परिषद प्रयत्न करीत आहे. परिषदेचे अध्यक्ष के शक्‍तिवेल यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात तयार कापडाची निर्यात वाढली आहे.

एप्रिलपासून ही निर्यात कमी होत होती. या उद्योगाला आधार मिळावा म्हणून केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या होत्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. सप्टेंबर महिन्यात तयार कापडाची निर्यात 10.2 टक्‍क्‍यांनी वाढून ती 1.2 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.