सातारा: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवस्वराज्य यात्रेला उपस्थिती लावली नसून, उदयनराजे यात्रेत का सहभागी होत नाहीत ? असा प्रश्न खासदार अमोल कोल्हेना विचारला असता त्यांनी ”उदयनराजे काही व्यक्तिगत कारणामुळे शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होत नाहीत” असे उत्तर देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
उदयनराजे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे ते शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होत नाहीत का? असा प्रश्न कोल्हेना विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणले उदयनराजे पक्षावर नाराज नाहीत. ते व्यक्तिगत कारणामुळे शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित राहू शकले नाहीत. असे म्हणून अमोल कोल्हे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेने आज कराड शहतात प्रवेश केला. कराडमध्ये यात्रा दाखल झाल्यानंतर अमोल कोल्हे यांच्या समवेत जयंत पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले.