‘त्या’ चिमुरड्याची हत्या करणारा दहशतवादी चकमकीत ठार

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांनी सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला ठार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रीनगरमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत दहशतवादी झाहीद दास याचा खात्मा करण्यात आला. अनंतनाग येथे जवानांनी त्याला घेरले होते. पण तेथून निसटण्यात तो यशस्वी झाला होता.

सीआरपीएफ आणि विशेष मोहीम पथकाकडून रात्री उशिरा संयुक्तपणे सर्च मोहीम सुरु करण्यात आली होती. यावेली चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. काश्मीर पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दहशतवादी झाहीद मारला गेला असल्याची माहिती दिली आहे.


गेल्या आठवड्यात अनंतनाग येथे सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला होता. तर सहा वर्षीय निहान याचाही मृत्यू झाला होता. निहान पार्क करण्यात आलेल्या गाडीत झोपला असताना त्याला गोळी लागली. २६ जून रोजी हा हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी दुचाकीवरुन आले होते आणि गोळीबार केला.

हल्ल्यानंतर पोलिसांनी लगेचच दहशतवादी झाहीदचा फोटो प्रसिद्ध केला होता. झाहीदचा हा इस्लामिक स्टेट (ISJK) या दहशतवादी ग्रुपचा सदस्य होता. मंगळवारी सुरक्षा जवानांनी झाहीद आणि इतर दोन दहशतवाद्यांना घेरलं होतं. पण यावेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तर इतर दोन दहशतावादी ठार झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.