राजकोट – देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. करोनापासून बचावासाठी लसीकरण अभियानही वेगाने सुरू आहे.
यादरम्यान गुजरातमध्ये सराफी समाजाने करोनाची लस घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखे अभियान सुरू केले आहे. येथे लोक करोनाची लस टोचून घेत आहेत आणि सोनारांकडून त्यांना एक भेट मिळत आहे.
इथे सराफांकडून एक लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे जिथे ज्या महिला लस टोचून घेत आहेत त्यांना एक सोन्याची चमकी भेट म्हणून दिली जात आहे. तर पुरुषांना हॅंडब्लॅंडर दिला जात आहे.
शनिवारी भारतात कोरोनाच्या विक्रमी 93,000 नवबाधितांची भर पडली.तर गेल्या 24 तासांत नव्या बाधितांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे.