नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा फाटा रस्त्यावर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर पाण्याचे बिसलेरी बॉक्स घेऊन जाणारा आयशर टेम्पो समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने पलटी झाला. यामध्ये टेम्पोचालकास किरकोळ इजा झाली असून, पाणी बाटल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नेवाशाहून नेवासा फाट्याकडे पाण्याच्या बिसलेरी घेऊन जाणाऱ्या आयशर (एमएच 17 सीव्ही 0901) चालकाला पुढे चाललेल्या दुचाकीला ओव्हरटेक करताना समोरून येत असलेल्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा टेम्पो पलटी झाला.
शिक्षक भरतीबाबत शिक्षणमंत्र्यांची महत्वपूर्ण माहिती, म्हणाले “राज्य शासन लवकरच जवळपास 30 हजार..”
या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाला असून, टेम्पोमध्ये असलेल्या बिसलेरी बॉक्स खाली पडल्याने मोठे नुकसान झाले. अपघातानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन रस्त्यावरील टेम्पो बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.